Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! स्वतःचे सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या…

बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. १७ फेब्रुवारी :बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव च्या पळशी खुर्द येथे एका शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेंद्र नामदेव बेलसरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

कधी अवकाळी पाऊस तर कधी पूरस्थिती तर कधी दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच आता शेतकरी तरुणांना मुली देण्यासही नकार येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बुलढाण्यातून आता अशीच एक घटना समोर आली आहे. शेतकरी असल्याने मुलगी देण्यास कुणीही तयार नव्हतं आणि आपलं लग्न जुळत नसल्याने बुलढाण्यातील तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपलं स्वत:चं सरण रचून या तरुणाने आत्महत्या केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नेमकं काय आहे प्रकरण?

या संदर्भात मृतक महेंद्र नामदेव बेलसरे याच्या भावोजींनी पोलिसांना सांगितले की, महेंद्र बेलसरे हा माझा मेव्हणा आहे. तो शेती व्यवसाय करत होता. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता महेंद्र मला भेटण्यासाठी आला होता. मी पेट्रोल पंपावर काम करतो. पेट्रोल पंपावर महेंद्र आला आणि मला म्हणाला, मला कुणी मुलगी देत नाही. माझं लग्न करुन द्या. मी त्याला तुझ्यासाठी मुलगी पाहतो असं म्हटलं. त्यानंतर महेंद्र निघून गेला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तो पुन्हा मला भेटण्यासाठी आला. माझी पत्नी पुष्पा हिला भेटण्यासाठी तो घरी गेला. त्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर रात्री ८ वाजता त्याच्या गावातून किशोर बेलसरे याने फोन केला. त्याने सांगितले की, महेंद्र याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. त्यानंतर मी घटनास्थळी जाऊन पाहिले असता महेंद्र बैलाच्या गोठ्यात मृतावस्थेत आढळून आला.

आपला मेव्हणा महेंद्र बेलसरे याने लग्न जुळत नसल्याने नैराश्येतून स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्याच्या मृत्यू बाबत आपल्याला कुठलाही संशय नसल्याचंही त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

हे देखील वाचा : 

कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची अखेर वन विभागाने केली सुटका..

अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.