Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची अखेर वन विभागाने केली सुटका..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि.१७ फेब्रुवारी : जागतिक कीर्ती प्राप्त लोणार सरोवरच्या अभयारण्य मधील एक बिबट्या लोणार सरोवराच्या काठावरील नगर सेवक गुलाब सरदार यांच्या शेताजवळील एका कोरड्या अंदाजे २० फुट असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याने सदर बिबट्या याने डरकाळी मारल्या मुळे त्याचा आवाज एकुण शेजारील शेतातील नगर सेवक गुलाब सरदार यांनी कोरड्या विहिरी जवळ येवून पाहणी केली असता बुधवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान कोरड्या विहिरीत एक बिबट्या असल्याचे त्यांना दिसुन आले.

त्यानंतर त्यांनी सदर बाब ही वनविभागातील अधिकारी यांना कळवताच वनविभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी येवून पाहणी करून बुलडाणा येथील रेस्कू टीमला एका कोरड्या विहिरीत वन्यप्राणी बिबट्या पडला असल्याबाबत कळविताच रेस्कू टीम यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन बिबट्यास काढण्या करीता रेस्कू करून सीडीच्या द्वारे बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेवेळेस बिबट्या याने सिडीद्वारे विहिरीच्या बाहेर येवुन पळ काढला.अश्या प्रकारे वनविभागाच्या बुलडाणा येथील रेस्कू टीमने एका बिबट्या याचे सुखरूप प्राण वाचविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर बिबट्या पाहण्या करीता लोणार शहरातील तसेच आजूबाजूला असणाऱ्या शेतकरी यांनी गर्दी केली असून गर्दीमुळे तेथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. त्यासाठी लोणार पोलीस स्टेशन ठाणेदार प्रदीप ठाकूर हे घटनास्थळी त्यांचा पोलीस बांधवासह उपस्थित होते. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी प्रत्यक्षस्थळी येवून पाहणी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बुलडाणा रेस्कू टीम मध्ये समाधान मांटे वनरक्षक, प्रविण सोनुने, पवन वाघ, सागर भोसले, दिपक गायकवाड, संदीप माळवी वाहन चालक तसेच लोणार येथील रेंजर पी. डी. सावळे, आर. एफ. ओ. सुशांत पाटील, कायंदे वनपाल, चौधरी वनरक्षक, विणकर वनरक्षक, वाहन चालक पवार या वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने अखेर दुपारी २.३० वाजेदरम्यान बिबट्या बाहेर काढण्यास यश मिळविले.

यादरम्यान बिबट्या हा साडेचार घंटे कोरड्या विहिरीत असून सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे येथील उपस्थितांनी वनकर्मचाऱ्यांचे यांचे आभार मानले.

हे देखील वाचा : 

अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्राची सुविधा.

वनाधारीत शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामसभांमध्ये होणार सामंजस्य करार

 

 

 

 

Comments are closed.