Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामपंचायत निवडणूक : नामनिर्देशनपत्र तपासण्यासाठी शनिवारी पालघर तहसील कार्यालय सुरु

तर, जात पडताळणी कार्यालय शनिवार- रविवारीही सुरू राहणार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. २३ सप्टेंबर : पालघर तालुक्यातील येऊ घातलेल्या ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी शेवटच्या दिवशी लागणारा वेळ आणि गर्दी आणि उमेदवारांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने शनिवार दिनांक २४/०९/२०२२ रोजी कार्यालयीन सुट्टी असली तरीही नामनिर्देशनपत्र तपासण्यासाठी पालघर तहसील कार्यालय सुरु राहणार आहे. शिवाय जात पडताळणी कार्यालय शनिवारी आणि रविवारीही सुरू राहणार आहे.

तरी, इच्छुक उमेदवारांनी तहसिलदार कार्यालय पालघर येथे उपस्थित राहून त्यांचे नामनिर्देशन पत्र तपासून घेण्यात यावे. जेणेकरुन अचुक नामनिर्देश पत्र दाखल होईल. परंतु शनिवारी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार नाही. केवळ नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करावयाचे शपथपत्र/प्रतिज्ञापत्र, जात पडताळणीकामी शिफारस पत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघरचे तहसीलदार सुनिल शिंदे यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याचप्रमाणे, उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी पालघर येथील जात पडताळणी कार्यालय देखील शनिवार आणि रविवारी देखील सुरू राहणार आहे. तरी, सर्व इच्छूक उमेदवारांनी उद्या शनिवार दि.25/09/2022 व रविवार दि.26/09/2022 रोजी पालघर येथील कार्यालयात जाऊन जात पडताळणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुलाल उधळत या, मात्र शिस्तीत या – उद्धव ठाकरे

अखेर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार!

 

 

Comments are closed.