Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुलाल उधळत या, मात्र शिस्तीत या – उद्धव ठाकरे

न्यायालयाच्या निणर्यानंतर ठाकरेंची प्रतिक्रिया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २३ सप्टेंबर : उत्साहात या, वाजत गाजत गुलाल उधळत, या मात्र शिस्तीने या, तेजस्वी वारशाला, आपल्या परंपरेला गालबोट लागेल असं वागू नका, आपण शिवरायांच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, इतर काय करतील माहिती नाही, पण दसरा मेळाव्याकडे राज्याबरोबर देशाचं आणि जगभरात राहणाऱ्या मराठी बांधवांचं लक्ष लागलं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत ठाकरेंची सरशी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या याचिकेवर केलेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास ठाकरेंना हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना “प्रत्येक वेळी आपण वाईटाचा विचार करु नये, आपण असं म्हणतो ना शुभ बोल रे नाऱ्या, म्हणजे ती म्हण आहे म्हणून मी बोलतोय” असं म्हणत टोमणा लगावला.

साडे चार तासांच्या सुनावणीनंतर मुंबई हायकोर्टाने अखेर उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाचे आभार मानतानाच आपल्या शिवसैनिकांना उत्साहात वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचं आवतानच धाडलं. तसेच न्यायालयाच्या निर्देशानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकार व्यवस्थित पार पाडेल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

अखेर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार!

“या” जिल्ह्यात 2.2 रिश्टर स्केलचा भुकंप

 

 

Comments are closed.