Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून पती स्वत: कोपऱ्यात उभं राहून पाहायचा

शेवटी संतापून पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल , पुण्यातील किळसवाणा प्रकार....

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

पुणे, 18 मे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक अत्यंत  किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला  दोन परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून पती स्वत: कोपऱ्यात उभं राहून पाहायच या प्रकारानंतर महिलेने (४८ ) पती आणि त्याच्या दोन परपुरुषावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती प्रमाणे , आरोपी पती पत्नीला नेहमी नाहक त्रास देत होता. पत्नीची इच्छा नसतानाही त्याने २०२० मध्ये हडपसर येथील एका लॉजवर परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर जुलै २०२१ मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका फ्लॅटवर दुसऱ्या एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हे सर्व होत असताना पती मात्र कोपऱ्यात उभं राहून पाहत होता. हे सर्व वारंवार घडत असल्याने शेवटी संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. पतीच्या अशा कृत्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कोणता पती आपल्या पत्नीसोबत अशा प्रकारचं कृत्य करू शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

बुद्ध पौर्णिमेला रात्री मचानवर बसून पर्यटकांसह प्राणी निरीक्षकांनी अनुभवले रोमांचक क्षण

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.