Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्मिता-जयदेव ठाकरेंवर कीर्ती फाटक यांचा हल्लाबोल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ७ ऑक्टोंबर : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे द्वितीय चिरंजीव जयदेव आणि त्यांची पत्नी स्मिता दोघे हजर होते. त्यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीवर उद्धव ठाकरे यांच्या आते बहीण कीर्ती फाटक यांनी निशाणा साधला आहे. स्मिता आणि जयदेव यांनी बाळासाहेबांना नेहमीच मनस्तापच दिला आहे. बाळासाहेब हयात असतांना स्मिता ठाकरे या काँग्रेसमध्ये निघालेल्या. हे शिंदे कसे विसरले.

कुटुंबातील कलहाचा अशाप्रकारे राजकारणासाठी वापर होणे दुर्दैवी आहे. हे राजकारण बघताना आमच्या कुटुंबियांना त्रास होत आहे. शिंदेचा ठाकरे कुटुंब आमच्या गटातही आहेत हे दाखविण्याचा शिंदेचा केविलवाणा प्रयत्न आहे असे त्या म्हणाल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बाळासाहेब असताना २००९ मध्ये स्मिता ठाकरे या काँग्रेसमध्ये जायला निघाल्या होत्या. तशा उघड प्रतिक्रिया आणि मुलाखती त्यांनी माध्यमांना दिल्या होत्या.सोनिया आणि राहुल गांधींचे गोडवे त्यांनी गायले होते. काँग्रेसची आयडियोलॉजी कशी छान आहे. तीच आपला देश पुढे नेऊ शकते, अशी वक्तव्ये स्मिता ठाकरे यांनी केली होती, याची आठवण कीर्ती फाटक यांनी करून दिली.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिंदेंच्या नातवाविषयी केलेल्या टिकेबाबत फडणवीस व्यथित

MPSC परिक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात 144 कलम लागू

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.