धक्कादायक! वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. ३ मार्च : तालुक्यातील जिमलगट्टा येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
मंजूळा रामा मडावी (१७) रा. रमेशगुडम, ता. सिरोंचा असे आत्महत्या करणा-या विद्यार्थीनीचे नाव आहे. मंजूळा रामा मडावी ही सिरोंचा तालुक्यातील रमेशगूडम येथील रहिवासी असून ती जिमलगट्टा येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता ११ वी वर्गाची विद्यार्थीनी होती. येथीलच वसतिगृहातून ती शिक्षण घेत होती. दरम्यान मध्यरात्री १२.३० वाजताच्या दरम्यान वसतिगृहातील विद्यार्थीनी लघूशंकेला गेल्या असतांना बाथरूम मधील भिंतीला असलेल्या लोखंडी पाईपला दोरी बांधून मंजूळाने आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
लागलीच विद्यार्थीनींनी याची माहिती तत्काळ अधीक्षिका अंबाडे यांना दिली. अधीक्षिकांनी मुख्याध्यापकाना याची माहिती देताच मुख्याध्यापकांसह शाळेतील सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुख्याध्यापकांनी घटनेची माहिती जिमलगट्टा पोलिसांना देताच घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थीनीच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून पुढील तपास जिमलगट्टाचे पोलिस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.
हे देखील वाचा :
ओबीसी आरक्षणावर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला; महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का
अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत


Comments are closed.