Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! तरुणाची निर्घृण हत्या!

एकाच दिवशी दोन खुनाच्या घटनेने हादरले जळगांव; शिवाजीनगर हुडको येथील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जळगाव, दि. २६ मार्च : शहरातील समता नगर येथे मध्यरात्री सागर पवार या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तोवर आज जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको येथे प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना 2 वाजेदरम्यान घडल्याने जळगाव शहर पुन्हा हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेश आनंदा सोनवणे हा तरुण शहरातील फेडरेशन येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. तो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचे शिवाजी नगर हुडको येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तो आज प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या शिवाजी नगर येथील घरी गेला असता. यावेळी त्याच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रशियन सैनिकांचा बंड; आपल्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारलं

वाहनांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत लवकरच नवा कायदा करणार – केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी

महिला स्वतः सक्षम होऊन दुसऱ्यांना सक्षम करतात – डॉ. संपदा नासरी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.