Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जनसंपर्कातून वेगळे विश्व केलेले मोठं नाव, उत्तम लेखक डॉ. बबन जोगदंड

'यशदा' च्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये नवीन शिकण्याची उर्जा निर्माण करणारे स्त्रोत म्हणजे डॉ. जोगदंड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

डॉ. बबन जोगदंड जनसंपर्कातून वेगळे विश्व केलेले मोठं नाव. उत्तम लेखक, अनेक पदव्या घेऊन नवीन रेकॉर्ड करणारे. ‘यशदा’ च्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये नवीन शिकण्याच्या संदर्भातली ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे. संमेलन परिषदा सेवाभावी चळवळी आणि या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण सार्थकी लावणारे अशी ओळख बबन जोगदंड यांची आहे.

एक गाव कुसातला मुलगा ज्याला शहराचं नाव ही माहीत नाही. तो मुलगा पुण्यासारख्या शहरांमध्ये येऊन अवघ्या देशाच्या जनसंपर्कात आपलं नाव कोरतो. अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करतो. जोगदंड यांनी उभं केलेलं काम नवतरुणांनी आदर्श म्हणून घ्यावं असंच आहे. आपलं कुटुंब आपले मित्र आपले समविचारी असणारे अनेक बुद्धिमान व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी, पदाधिकारी या सगळ्यांची मोट बांधून सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यामध्ये डॉ. बबन जोगदंड यांनी घेतलेला पुढाकार हा नक्कीच नोंद घेण्यासारखा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

दहावी-बारावी परीक्षांच्या निकाल पुन्हा शिक्षकांच्या बहिष्कारामुळे लांबणीवर?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.