Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वच्छता हा निरोगी आयुष्य जगण्याचा पाया आहे : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,  दि. २२ एप्रिल : जसे घराचे अंगण असते तसाच आपल्या विद्यापीठाचा हा परिसर आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता करण्यासाठी पहाटे हातात झाडू घेऊन कोणी उठायच्या आत काम करू शकतात. तर आपणही स्वच्छता करू शकतो.अशी प्रेरणा आपल्याला अशा महान व्यक्तीकडून मिळते . स्वच्छता हा निरोगी आयुष्य जगण्याचा पाया आहे . तेव्हाच आपण निरोगी राहू शकतो ,जेव्हा आपण साफसफाई करण्याची सवय आचरणी लावू. समृद्ध आणि निरोगी राष्ट्र निर्माण करण्याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेकडे वाटचाल करायची आहे. आपण आपली व्यक्तिगत स्वच्छता तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे, असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित स्वच्छता व शारीरिक श्रमदान अभियानात व्यक्त केले . यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ.सुरेश रेवतकर, कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे , राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांची उपस्थिती होती.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे पुढे म्हणाले, जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपण आपल्या विद्यापीठाचा परिसर देखील स्वच्छ ठेवला पाहिजे. स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, स्वच्छतेचं पालन सर्वांना करणे आवश्यक आहे. विद्यापीठ हे विद्येचे घर आहे. त्यामुळे विद्यापीठाचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून स्वच्छतेसाठी आपल्याला नेहमी कार्यरत राहायला हवे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी या उपक्रमा मागची पार्श्‍वभूमी विशद केली. माननीय कुलगुरू महोदय यांच्या संकल्पनेतून दर शुक्रवारी स्वच्छता व आणि शारीरिक श्रमदान अभियानाचे आयोजन विद्यापीठात करण्यात येते. हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे ,असे ते यावेळी म्हणाले.

विद्यापीठातील सर्व संविधानिक अधिकारी, अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विद्यापीठ प्रांगणात श्रमदान करून विद्यापीठाचा परिसर स्वच्छ केला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे आणि वैभव मसराम यांनी उपक्रमाच्या सफल आयोजनासाठी परिश्रम घेतले. संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे आणि आभार वैभव मसराम यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गावातील स्वच्छता ही घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पूर्ण होईल – संजय मीणा

उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी

‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ या मोहिमेतंर्गत शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड

 

Comments are closed.