Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाहतूक पोलीसाला गाडीच्या बोनेटवर नेले फरफटत….

खारघर येथील जीवघेणा प्रकार ...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क,

नवी मुंबई , दि, ९ जुलै : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर खारघर वाहतूक विभागाकडून विशेष कारवाई मोहीम सुरू असताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या एका वाहनचालकाने वाहतूक पोलीसालाच गाडीच्या बोनेटवर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार खारघर येथे घडला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस कर्मचारी गादेकर हे खारघर कोपरा ब्रीज या ठिकाणी विशेष कारवाई दरम्यान रस्त्याच्या विरुध्द येणाऱ्या वाहनांवरती कारवाई करीत होते. त्यावेळी कोपरा सेक्टर १० कडून विरूध्द दिशेने येणारी MH 46BZ6296 क्रमांकाची होंडाई कंपनीची निओस कार गादेकर
यांनी ही कार रोखली असता त्या वाहनचालकाने कार न थांबवता थेट कारवाई करत असलेल्या गादेकर यांच्या अंगावर घातली. त्यानंतरही कार न थांबवता डिमार्ट कडे जाणाऱ्या रस्त्यावर कोपरा ब्रीज ते स्वर्णा गंगा ज्वेलरी शॉप खारघर या ठिकाणापर्यंत गाडीच्या बोनेट वर वाहतूक पोलिसाला तसेच फरफटत नेले.

त्यादरम्यान पनवेलमधील लाइफलाईन हॅस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर जानवी पाटील यांनी हा प्रकार पाहताच त्यांनी सदर गाडीचा पाठलाग करून स्वतःची गाडी त्या फरपटत घेऊन जाणाऱ्या गाडीच्या पुढे नेऊन अडवली. यावेळी पाठीमागून धावत येणारे पोलीस नाईक निवृत्ती भोईर यांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याला खारघर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले तसेच पोलीस स्टेशन मधील स्टाफने डॉ.जानवी पाटील यांचे कौतुक करून आभार मानले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू!

वीज पडून एका इसमाचा मृत्यू !

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.