Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतिशय दुःखद घटना..पत्रकार राम परमार यांचे निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. २२ जुलै : पालघर येथील हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी राम परमार यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या या अवेळी मृत्यूने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या दत्तनगर येथिल राहत्या घराकडून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

राम परमार यांनी अतिशय अभ्यासू आणि धाडसी वृत्तीने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मिड डे, हिंदुस्तान टाइम्स सारख्या नावाजलेल्या इंग्रजी वृत्तपत्रातून आपल्या लेखणीची छाप पाडली होती. समाजातील अन्यायकारक आणि संवेदनशील विषयावर ते नेहमीच ठाम भूमिका घेऊन अतिशय प्रामाणिकपणे बातमीदारी करायचे. त्यांच्या या निडर आणि निष्पक्ष पत्रकारिते मुळे त्यांचा प्रशासन तसेच राजकीय क्षेत्रात देखील दबदबा होता. सध्या ते हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रासाठी काम करीत होते. या अगोदर त्यांनी मिड डे या वृत्त पत्रात देखील उल्लेखनीय बातमीदारी केली होती. त्यांच्या अतिशय दिलखुलास आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्वभावामुळे त्यांचा जनसंपर्क आणि मित्र परिवार मोठा होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या ३-४ दिवसांपासून त्यांना गॅसट्रोची लागण झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली असता त्यांना पालघरमधील ढवळे मेमोरियल रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यूने गाठले.

त्यांच्या जाण्याने पालघर जिल्यातील पत्रकारिता क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. राम परमार यांच्या दुःखद निधनाबाबत,पत्रकारिता, पोलिस, महसूल, राजकीय,सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. स्व. राम परमार यांना लोकस्पर्श न्युज नेटवर्क परिवार भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.