Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुलीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नालासोपारा प्रगती नगर परिसरातील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नालासोपाऱ्यात मुलीच्या वादातून एका तरुणाला ८ ते १० जणांच्या जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर परिसरात ही घटना घडली असून मारहाण करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

सोनू पटेल असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो राहत असलेल्या परिसरातील एका मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते मात्र मुलीच्या कुटुंबियांना ते पसंत नव्हते त्यामुळे या वादातून मुलीच्या भावाने व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून त्याला ठोशा बुक्क्यांनी व लाकडी फळीने जबर मारहाण केली. तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.