Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

WCL ने कोळशाच्या शेत्रात आणखी उत्पादन वाढवावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर, दि. १६ एप्रिल :  वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड ने कोळशाच्या शेत्रात आणखी उत्पादन वाढवावे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडच्या वतीने नागपुरातील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगाच्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते पुढे ते म्हणाले.

येणाऱ्या काळात प्रॉडक्टविटी वाढली पाहिजे असेही ते म्हणाले. हे जे प्रशासन आहे चार चार वर्ष फाईल घेवून बसतात एका एका गोष्टीच्या परवानगीसाठी दिल्लीला पत्र पाठवीत असतात हे काम सहा महिन्यात झाले असते तर देशात कोळशाची कमतरता झाली नसती आता कोळसा आयात करावा लागतो आहे असेही ते म्हणाले. जिथे कोळसा आहे तिथे माईन त्वरित उघडण्याची कारवाही झाली पाहिजे असेही ते म्हणाले. कोळसा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय झाला असल्याचेही ते म्हणाले. मागासवर्गीय, गरीब मुलांना CSR च्या माध्यमातून मदत मिळाली तर फार छान होईल असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लहान लहान मुलांना ऐकू येत नाही अश्याचे ऑपरेशन केले तर त्यांना ऐकू येऊ शकत यामुळे मुलांना जीवन मिळणार आहे असेही ते म्हणाले. यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग नागरिक आणि मुलांना त्यांना आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप देखील करण्यात आले तसेच ज्या दिव्यांगाना फूट मिळाले त्यांनी कराटे चे प्रात्यक्षिक दाखविले तसेच दुचाकी गाडी देखील मान्यवरांच्या समोर चालवून दाखविली. कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, WCL चे नागपूर चे MD मनोज कुमार , आमदार आशिष जैस्वाल उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुलीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जिल्हा परिषदच्या लेखाअधिकाऱ्याचा पैसे घेताना व्हिडिओ वायरल

 

 

Comments are closed.