श्रद्धा वालकरच्या वडिलांचे वसई पोलिसांवर गंभीर आरोप
पत्रकार परिषदेआधी विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 09, डिसेंबर :- वसईच्या तुळींज आणि मणिपूर पोलिसांनी असहकार्य केले. तसं झालं नसतं तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असा आरोप श्रद्धा वालकरचे वडिल विकास वालकर यांनी आज केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपा नेते किरिट सोमय्यासुद्धा उपस्थित होते.
वसई येथील तुळींज पोलीस ठाणे आणि मणिपूर पोलीस ठाण्याच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे मला त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी. जर तसं झालं नसतं तर माझी मुलगी जिवंत असती. किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली नसती. मला माझ्या मुलीसाठी न्याय मिळावा यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे, असं विकास वालकर म्हणाले.
माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे, आफताब पुनावाला याने श्रद्धाची अत्यंत क्रुरपणे हत्या केली असून त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. या कटात सहभागी असलेल्या अफताबच्या कुटुंबीयांनाही जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. तसंच, कटात सहभागी असणाऱ्या इतर लोकांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विकास वालकर यांनी यावेळी केली.
हे देखील वाचा :-
https://fb.watch/hhsIndVGF3/


Comments are closed.