Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सॅमसंगचे हे स्मार्टफोन झाले ३ हजारांनी स्वस्त.

तुम्ही जर सॅमसंग स्मार्टफोनचे चाहते असाल तर सॅमसंगचे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

दिवाळी सीजन पाहता सॅमसंगने आपल्या काही जबरदस्त स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने आधी Galaxy Note 10 स्मार्टफोनच्या किंमतीत २७ हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे. आता कंपनीने आपल्या आणखी तीन स्मार्टफोनच्या किंमतीत Galaxy A21s, Galaxy A31, आणि Galaxy M11 कपात केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Samsung Galaxy A21s २५०० रुपयांनी स्वस्त
कंपनीने गॅलेक्सी ए२१ एस ला जूनमध्ये लाँच केले होते. त्यावेळी या फोनची किंमत ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ४९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी मॉडलची किंमत १८ हजार ४९९ रुपये होती. आता कंपनीने किंमतीत २५०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. फोनच्या ४ जीबी रॅमची किंमत १४ हजार ४९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी मॉडलची किंमत १५ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनच्या १२८ जीबी मॉडलची किंमत १६ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Samsung Galaxy A31 ३ हजारांनी स्वस्त
सॅमसंगने गॅलेक्सी ए ३१ ला २१ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. ३ हजार रुपयांच्या कपातीनंतर आता हा फोन १८ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले 48MP + 8MP + 5MP + 5MP चा रियर कॅमेरा आणि २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच 5000mAh बॅटरी मिळते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Samsung Galaxy M11 ३ हजारांनी स्वस्त
सॅमसंगच्या या फोनमध्ये ३ जीबी प्लस ३२ जीबी मॉडलची किंमत १० हजार ४९९ रुपये आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी मॉडलची किंमत ११ हजार ९९९ रुपये होती. फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची किंमत कमी केली आहे. आता या फोनला ९९९९ रुपयेआणि ११ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकतो. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Comments are closed.