Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

IPL 2020 आज मेगा फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स ची मुंबई इंडियन्स सोबत लढत.

आयपीएलच्या १३व्या हंगामाचा विजेता आज ठरणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

IPL 2020 गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाची आज अखेरची लढत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. यात विद्यमान विजेते मुंबई इंडियन्सकडे पाव्यांदा तर दिल्ली कॅपिटल्सकडे पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी असेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अंतिम लढतीत आलेल्या दोन्ही संघांनी स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. गुणतक्त्यात देखील हे संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. या दोन्ही संघांकडे जगातील अव्वल क्रमांकाचे जलद गोलंदाज आहेत. दिल्लीकडे कागिसो रबाडा आणि एनरिच नोर्जे तर मुंबईकडे जरप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्ट अशी अव्वल गोलंदाजांची फळी आहे. या चारही गोलंदाजांनी आयपीएलचा १३वा हंगाम गाजवला आहे. रबाडाने २९, बुमराहने २७, बोल्टने २२ तर नोर्जेने २० विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा या दोन्ही संघातील गोलंदाजांमध्ये टक्कर होईल आणि ज्या संघातील जलद गोलंदाज यशस्वी होतील विजयाचे पारडे त्या संघाकडे झुकेल.

फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजी देखील दोन्ही संघांची चांगली आहे. या दोन्ही संघाला मालिकेत चांगली सलामी भेटली नाही. विशेषत: दिल्लीसाठी सलामीचे फलंदाज ही डोकेदुखी ठरली. शिखर धवन वगळता अन्य सलामीच्या फलंदाजांना मोठे अपयश आले. तुलनेत मुंबईची बाजू चांगली आहे. रोहित शर्मा वगळता क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांनी कोणत्या ना कोणत्या सामन्यात विजय मिळून दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.