Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म!

मुंबईतील धक्कादायक प्रकार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २६ ऑगस्ट : आदिवासी भागात रस्ते किंवा वाहने नसल्याने गर्भवतींना डोल्यांमधून किंवा खांद्यावरून नेल्याच्या घटना मागील काही दिवसांत मुंबईजवळच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांत घडल्या आहेत. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका गरीब महिलेची प्रसूती रिक्षामध्ये झाल्याची घटना मुंबईत घडली आहे.

रिक्षात प्रसूती झालेल्या महिलेच्या पतीने धावतपळत सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालय गाठले. तिथे त्वरित आई अन् नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दाखल केल्यामुळे पुढील वैद्यकीय गुंतागुंत मात्र टळली. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रमेश यादव यांनी आपल्या पत्नीला गावाहून मुंबईत प्रस्तुती साठी आणले. ते राहतात त्या सांताक्रूझ मधील शास्त्रीनगर येथून रुग्णालय गाठण्यासाठी दहा ते बारा मिनिटांचा अवधी लागतो. मात्र सध्या रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे तिप्पट वेळ लागत आहे. मागील गुरुवारी यादव यांच्या पत्नीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. रस्त्यातील खड्डे चुकवत वाहतुककोंडीमधून मार्ग काढत येणाऱ्या यादव यांच्या जिवाची घालमेल होत होती.

घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी वाहतुककोंडीमुळे त्यांना पस्तीस-चाळीस मिनिटांचा अवधी लागला. प्रसवकळांनी बेहाल झालेल्या त्यांच्या पत्नीची अखेर रिक्षामध्येच प्रसूती झाली. बाळ व आईला घेऊन ते रुग्णालयामध्ये नेले, तेव्हा डॉक्टरांनी त्वरित बाळाला अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले. बाळाला नीट श्वास घेता येत नव्हता. आता मात्र बाळाची प्रकृती ठीक असल्याचे यादव यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रस्त्यावरील खड्डे व वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकांना रुग्णांना नेण्यास-आणण्यास वेळ लागतो. गर्भवती, अस्थिव्यंग तसेच अन्य रुग्ण, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना सांभाळून न्यावे लागते. त्यांना रुग्णालयापर्यंत पोहचेपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे अनेक रुग्णवाहिकाचालकांना रुग्णाच्या नातेवाईकांचा ओरडाही खावा लागतो, याकडे रुग्णवाहिकाचालकांनी लक्ष वेधले आहे.

हे देखील वाचा :

कोल्हापुरात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के

 

“त्या” दोन मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.