Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ांचा गांभीर्याने विचार करा

विरोधी पक्षनेते अजित पवार कडाडले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई २६ ऑगस्ट – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात १६५ सुट्टय़ा मिळतात. वर्षातले सहा महिनेच ते काम करतात. या कर्मचाऱयांच्या सुट्टय़ांचा गांभीर्याने विचार करा, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारी सुट्टय़ांवर नाराजी व्यक्त केली.विधानसभेत अल्पकालीन चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी चिखलदरा – धारणीतील बालमृत्यू व कुपोषणाचा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशनापूर्वी अजित पवार यांनी या भागाचा दौरा केला होता. कुपोषणग्रस्त भागातील भीषण वास्तव त्यांनी सभागृहासमोर मांडले. त्यांनी कुपोषण व गरोदर मातांचा विषय मांडला.

आपल्याकडे सरकारी नोकरीतील महिलांना प्रसूतीपूर्वी तीन महिने व प्रसूतीनंतर तीन महिने अशी भरपगारी रजा मिळते. पण मेळघाट – धारणी व इतर आदिवासी भागात मनरेगा अंतर्गत 100 दिवसच काम असते. त्यानंतर रोजगार मिळत नाही. त्यामुळे या भागातील गरोदर मातांना प्रसूतीपूर्वी तीन व प्रसूतीनंतर तीन महिने असा सहा महिने सरकारने रोजगार द्यावा. कारण बालकांचे पोषण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. कुपोषण व अपुऱया रोजगाराच्या प्रश्नाच्या निमित्ताने त्यांनी सरकारी कर्मचाऱयांना मिळणाऱया सुट्टय़ांकडे लक्ष वेधले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सरकारी कर्मचाऱयांना 40 ते 45 टक्के सुट्टय़ा असतात. लोकप्रतिनिधींना तर चोवीस तास काम करावे लागते. कोणत्या तरी राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीच्या दिवशी दुप्पट काम करतात. सुट्टय़ा घेऊन घरी बसण्यापेक्षा दुप्पट काम करावे. सरकारी कर्मचारी सहा महिने काम करतात सहा महिने रजा असतात. त्यामुळे सरकारी कर्मचाऱयांच्या सुट्टय़ांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.