जेष्ठ वकील उज्ज्वल निकम फडणवीसांच्या भेटीला; चर्चेला आले उधाण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. ३० ऑगस्ट : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत.
या पाश्र्वभूमीवर निकम यांच्या भेटीला महत्त्व आले आहे. काही दिवसांपूर्वी निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांचा बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. मात्र आजच्या फडणवीस यांच्या सोबतच्या भेटीने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ऍड. निकम हे सध्या काही खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून काम पहात असून याच संदर्भात भेट घेतल्याचे समजते.
हे देखील वाचा :


Comments are closed.