Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इतकं महागात पडेल कल्पना नव्हती…

शरद पवारांची मिश्किल प्रतिक्रिया...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे, ३०, ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यातच शरद पवार यांना पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी मिश्कील उत्तर देत फिरकी घेतली.
बारामती येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. तसेच त्यांचं बोट धरून आपण राजकारणात आल्याचं म्हटलं होतं. या संदर्भात पवार यांना विचारण्यात आलं की, मोदी तुमचं बोट धरून राजकारणात आले. त्यावर पवार म्हणाले की, “मला कल्पना नव्हती की हे इतके महाग पडेल.यावेळी शरद पवार म्हणाले की, बिगरभाजप पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र आपण वयामुळे कोणतीही जबाबदारी घेणार नाही. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मोदी सरकारने २०१४ पासून ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन दिले होते. इंटरनेटद्वारे गावे जोडणी केली जाईल, प्रत्येक घरात शौचालय, पाणी आणि वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण केले नाही. केवळ छोट्या पक्षांना सत्तेतून बेदखल करणे हेच भाजपचे उद्दिष्ट असल्याचे पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी मी बिगर-भाजप पक्षांना एकत्र आणण्यास मदत करणार असल्याचही पवार यांनी नमूद केलं.

हे देखील वाचा :- 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवा अन्यथा चक्काजाम आलापल्ली व्यापारी संघटनेचा ईशारा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मेट्रो प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Comments are closed.