Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेट्रो प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 30, ऑगस्ट :-  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-स्पिझ काँरीडोरचे मुंबई मेट्रो ३च्या पहिल्या भूमिगत चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारिपुत नगर आरे कॉलनी येथे झाला. यावेळी जपान सरकारचे डेप्युटी कौन्सिल जनरल तोशेहिरो कानेको मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या अश्विनी भिडे , आमदार दिलीप लांडे, अतुल भातखळकर आदी उपस्थित होते,
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर १७ लाख प्रवासी प्रवास करू शकतील, आणि रस्त्यांवरील साडे सात लाख वाहने कमी होतील. वाहतूक कोंडी कमी होऊन ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्ष घेऊनच या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. मेट्रो रेल्वे भविष्यात मुंबईची लाईफ लाईन बनणार आहे. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टिपेश्वर अभयारण्यातील जखमी अस्वल परत नैसर्गिक अधिवासात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वीज कर्मचाऱ्याला भल्या मोठ्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

Comments are closed.