Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूरचा ‘सारंग बोबडे’ फोर्ब्सच्या यादीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. 10 फेब्रुवारी : चंद्रपुरात राहणाऱ्या सारंग बोबडे या युवकाची अंतरराष्ट्रीय मॅगझीन फोर्ब्सने अनोखी दखल घेतली आहे. भारतात अतुलनीय कार्य करणाऱ्या ‘तीस वर्षे वर्षाखालील गेम चेंजर’ मध्ये चंद्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी धडपडणार्‍या तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यवसायिक, डिझायनर, तसेच खेळाडूंचा ‘फोर्ब्स इंडिया’ यादीत मान मिळविला आहे.

2017 नंतर एकलव्य इंडिया चे संस्थापक आणि सीईओ राजू केंद्रे यांच्या पुढाकारातून अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे हे त्रिकूट एकत्र आले या तिघांच्या परिश्रमातून डोनेटकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. या माध्यमातून 10 लाखाहून अधिक देणगीदारांकडून तब्बल 150 कोटींच्या देणग्या विविध भागात काम करणाऱ्या 1 हजार स्वयंसेवी संस्थांना पुरविण्याच्या अनोखा विक्रम या त्रिकुटाने केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याची दखल ‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकाने जागतिक पातळीवर घेतली. या मासिकाने 2022 च्या अंकात भारतातील 30 वर्षाखालील युवकांच्या 30 जणांमध्ये एनजीओ अँड सामाजिक उद्योजकता गटाध्ये ‘सहसंस्थापक डोनेटकार्ट’ म्हणून अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे यांचा समावेश केला आहे. इतर दोघे हे अन्य राज्यातील आहेत. मूळचे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी असलेले सारंग चे वडील कालिदास बोबडे हे चंद्रपूर तालुक्यातील पिंपरी येथील जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत तर आई याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

सारंग चे दहावीपर्यंत शिक्षण चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूल मध्ये पूर्ण झाले. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले यानंतर अनिल कुमार रेडी संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे हे त्रिकुट एकत्र आले त्‍यांनी डोनेटकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून अतुलनीय कामगिरी करून हा लौकिक मिळविला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सारंगच्या या यशाविषयी त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना जेवण डबे उपलब्ध करून देणे. व देशाच्या विविध भागात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून या सारंग व त्याच्या मित्रांनी लक्षवेधी कामगिरी बजावली आहे.

हे देखील वाचा : 

“महाराष्ट्राच्या ‘एकलव्य’ चा जगविख्यात फोर्ब्सच्या यादीत समावेश”

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

 

Comments are closed.