Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा गांधींचे नेतृत्व देशाच्या सीमा तोडून पसरत गेले. – राज ठाकरे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. २ ऑक्टोंबर‘महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला.

पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महात्मा गांधी यांची आज जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. राजकीय नेत्यांसह दिग्गजांकडून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली जात आहे. ‘ सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही’ असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केलं.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून अभिवादन केलं आहे. तसंच, राज ठाकरे यांनी लालबहाद्दुर शास्त्री यांनाही अभिवादन केलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.