Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोशल मीडियातून मनोरुग्ण महिलेला ठरवले चोर,अफवांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वसई, दि. २ ऑक्टोंबर : मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवांमुळे पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे. सोशल मीडियावरून वारंवार येणाऱ्या पोस्टमुळे सतर्कता म्हणून पोलिसांना संपूर्ण यंत्रणा अलर्ट करावी लागत आहे. असाच प्रकार आचोळे पोलीस याच्या आहे. पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवु नये, त्याला खतपाणी घालू नये, थेट पोलीसांशी संपर्क साधून खात्री करुन घ्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

चॉकलेट वाटणारी महिला आणि मद्यपीला मुले चोर ठरवल्यामुळे आता चक्क एका मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीला मुलांना पळवणारी चोर ठरवण्यात आल्याची घटना आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुंबई, ठाणे, पनवेल आणि वसई तालुक्यात मुले चोरणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वसंतनगरी मैदानाजवळ एक महिला संशयास्पदरित्या वावरत होती, असा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर त्या महिलेकडे ४ मोबाईल आणि ड्रग्सचे चॉकलेट सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे पालकवर्गात भितीचे वातावरण पसरले. पोलीसांशी संपर्क साधला असता. हे व्हिडीओ फेक असल्याचे निष्पन्न झाले.

सदर महिला मानसिक रुग्ण असून, ती घरातून निघून गेली होती असे वास्तव समोर आले आहे. पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवु नका. त्याला खतपाणी घालू नका. थेट पोलीसांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी. पोलीसांचे न ऐकता सोशल मिडीयावर नागरिक मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवून अफवेला खतपाणी घालीत असल्यामुळे पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काही दिवसांपूर्वी महिलेचा पाठलाग करणाऱ्या रोडरोमियोला झाडाला बांधून माणिकपुर पोलीसांच्या स्वाधीन पोलीस करण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी महिला चॉकलेट वाटत असण्याची घटना अर्नाळा पोलीस ठाण्यात घडली. तुळींज पोलीस ठाण्याच्या हदित संतोषभवन परिसरात एक मद्यपी तर्रर होवून फिरत होता. या सर्व घटनेत अफवा पसरत आहे. मिडीयाच्या माध्यमातून वेगाने घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मिडीयावर मुले चोरणारी अफवा आहे. कोणीही विश्वास ठेवु नका, वसंतनगरी परिसरात वावरणारी महिला संतोष भवन येथील आहे. ती मानसिक रुग्ण आहे. त्यातून ती घरातून निघाली तिच्याकडे सापडलेले ४ मोबाईल तिच्या आई-वडिलांचे आहेत. तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चंद्रकांत सरोदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

हे देखील वाचा : 

महात्मा गांधींचे नेतृत्व देशाच्या सीमा तोडून पसरत गेले. – राज ठाकरे

सामनातून शिंदे गटाला रोखठोक उत्तर

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

 

Comments are closed.