Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामनातून शिंदे गटाला रोखठोक उत्तर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 मुंबई, दि. २ ऑक्टोंबरउद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या जवळीकीचे भांडवल करुन शिवसेनेविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटाला ‘सामना’ तील रोखठोक या सदरातून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करुन शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली, असा प्रचार शिंदे गट करतो. मात्र, ठाण्याच्या राजकारणात आनंद दिघे यांनीच भाजपला दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी काँग्रेसची सोबत कशी घेतली होती, याचा लेखाजोखा, रोखठोक सदरातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

आनंद दिघे हे काँग्रेस विरोधक आणि भाजपभक्त होते, अशी आज त्यांची प्रतिमा निर्माण केली जात आहे. हे साफ चूक आहे. अनेक वर्षे ठाण्यातील राजकारण हे आनंद दिघे व वसंत डावखरे या जोडगोळीच्या युतीने केले. दोघांचे संगनमत व मैत्री होती. डावखरे काँग्रेसचे व नंतर राष्ट्रवादीचे झाले. भारतीय जनता पक्षाला ठाण्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिघे व डावखरे कधी उघडपणे तर कधी पडद्यामागून सूत्रे हलवीत, असा दावा रोखठोक या सदरातून करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मडावी यांचे अपघाती निधन

Comments are closed.