Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मडावी यांचे अपघाती निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भामरागड, दि. 2 ऑक्टोंबर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. विजय मडावी (४२) यांचे दुचाकी अपघातात निधन झाले आहे. हि घटना शनिवार सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने आरोग्य विभागात हळहळ व्यक्त केल्या जात असून सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक डॉ. विजय मडावी हे प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे दि. १ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सद्यास्थितीत सुरु असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत आपल्या कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी तसेच सायंकाळी कोविड लसिकरणाचे काम आटोपवून स्वतःच्या दुचाकीने  घरी जाण्यसाठी भामरागडला निघाले असता मलमपोडूर गावानजीकच्या मार्गावर त्यांचा दुचाकीने भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत एकही व्यक्ती नसल्याने डॉक्टर रस्त्यावरच पडून राहीले. सदर मार्ग सूनसान असल्यामुळे अपघात कसा झाला हे कोणालाही कळू शकले नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी डॉ. विजय मडावी यांना लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचाराकरिता दाखल केले. परंतु त्यांच्या डोक्यातून व कानातून तीव्र रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी  रुग्णवाहीकेद्वारे ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पाठविण्यात आले. मात्र त्यांच्या उपचारार्थ त्यांचे निधन झाले. सदर घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

डॅा मडावी यांनी तब्बल ११ वर्षे भामरागड सारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा पुरविण्याचे विशेष काम केलेले आहे. मागील १० वर्षापासुन ते उपकेंद्र मिरगुडवंचा, प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा, भामरागड येथे कार्यरत होते तसेच मागील १ वर्षापासुन ते प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे प्रतिनियुक्तीवर आरोग्य सेवेचे काम करत होते. डॉ. मडावी  रुग्णांच्या सेवेकरीता नेहमी तत्पर असायचे, त्यांचा स्वभाव प्रेमळ व  मनमिळावु असल्याने त्यांनी लोकांच्या मनात जवळीक निर्माण केली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ. विजय मडावी  यांचे मूळ गाव भामरागड तालुक्यातील बामनपल्ली असून त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगी, १ मुलगा असा आप्त परिवार आहे. सदर घटनेने त्यांच्या घरावर दुःखाचे डोंगर कोसळले असून सर्वत्र परिसर शोकाकुल झाले आहे.

डॅा मडावी यांनी तब्बल ११ वर्षे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून आरोग्य सेवा देवुन सुद्धा त्यांची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने  असल्या कारणाने त्यांच्या मागे शासनाकडून कुटुंबास कोणतीच आर्थिक सुरक्षितता नाही. ही बाब अतंत्य गंभीर स्वरुपाची असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा :

राज्य सरकारने सात अधिकाऱ्यांना माघारी बोलवले .

 

एमआयटीच्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

 

Comments are closed.