Corona Vaccine:- अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस
लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन डेस्क 14 डिसेंबर: अमेरिकेत फायझर लसीच्या तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आजपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना लशीच्या पुरवठ्याचं काम पाहत असलेल्या गुस्ताव पर्ना यांनी याबाबत अधिक माहिती दिली. लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं.
अमेरिकेत मागच्या आठवड्यामध्ये बुधवारी कोरोनामुळे तीन हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता लस मंजूर झाल्यानंतर, देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रित येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गुरुवारी आठ तासाच्या महत्त्वाच्या बैठकीत एफडीए पॅनेलच्या सदस्यांनी फायझर लसीच्या वापराला पाठिंबा दिला. त्यामुळे ब्रिटन, कॅनडानंतर तात्काळ अमेरिकेतही या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आणि आज या लसीचे डोस नागरिकांना देण्यात येणार आहे.
हे पण वाचा:-हिंगणघाट जळीत कांड प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम कोर्टात दाखल सुनावणीला सुरुवात.
फायझर कंपनीची कोरोना व्हायरसवरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने ही लस सुरक्षित असल्याचं मान्य केलं आहे. खरंतर, मागील गुरुवारीच, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार पॅनेलवरील फायझर-बायोनोटेकच्या सल्लागार एक्सपर्ट पॅनेलने यावर बैठक घेत हा महत्त्वाचा निर्णय दिला होता. अमेरिकामध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या घटना रोखण्यासाठी लसीचा तातडीने वापराला परवानगी देण्यात आली.
Comments are closed.