Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंगणघाट जळीत कांड प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम कोर्टात दाखल सुनावणीला सुरुवात.

हिंगणघाट शहरात तगडा पोलीस बंदोबस्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा डेस्क 14 डिसेंबर:- हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणात आज हिंगणघाट येथे सुनावणी होत आहे. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात ही सुनावणी होत आहे कोविड दरम्यान न्यायालयीन कामकाज बंद असल्याने या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी थांबली होती. पण आता या न्यायालयीन कामकाजाला वेग आला आहे. आज हिंगणघाट येथे सरकारी वकील उज्वल निकम दाखल झाले आहे. न्यायालय परिसरातमोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. दंगल पथक तैन्यात करण्यात आले आहे. या शिवाय हिंगणघाट शहरात चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैन्यात आला आहे. नेमके या प्रकरणाला पहिल्याच दिवशी सुनावणीमध्ये काय समोर येतंय याचीच उत्सुकता नागरिकांना लागली आहेय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांकडून 426 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी वकील उज्वल निकम सरकारी पक्षाकडून नेमकी काय बाजू मांडते आणि पुढे हा खटला कसा चालतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

(हे पण वाचा भाजप आमदाराच्या कारला मोटारसायकलची जोरदार धडक)

काय आहे हिंगणघाट जळीत कांड प्रकरण

3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या प्राध्यापक असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचे राज्यात पडसाद उमटले होते. गुन्हेगार विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात आहे. जळीतकांडानंतर राज्यभरात निर्माण झालेला रोष पाहता सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यात खटला निकाली काढून आरोपीला शिक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया खोळंबली होती. पोलिसांनी हिंगणघाटच्या घटनेनंतर अवघ्या 25 दिवसांत 28 फेब्रुवारीला न्यायालयात 426 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

Comments are closed.