व्वा!… रस्ते दुरुस्ती साठी पैसा नाही पण मंत्र्यांच्या बंगला दुरुस्ती वर तब्बल ९० कोटींचा खर्च
करोनामुळे राज्य आर्थिक संकटात असताना दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क १४ डिसेंबर:- भारतात कोरोना मुळे आर्थिक मंदी असताना कोरोना लॉकडाऊनमुळे राज्य आर्थिक संकटात असताना दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक केले जातायत. यासाठी तब्बल ९० कोटींचा खर्च केला जातोय अशी माहिती मध्यमाचे विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. बंगल्याचे काम सुरु असताना महागड्या वस्तू वापराव्या असा दबाव मंत्री आणि त्यांचे पीए, पीएस आणतात असे दिसून आलंय.
सर्वाधिक खर्च झालाय तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर ३ कोटी २६ लाख इतका खर्च झालाय. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर ३ कोटी ८९ लाख, कोरोना काळात राज्यावर आर्थिक ताण असताना जनतेच्या कराच्या पैशांतून अशाप्रकारची हौस पूर्ण करणं योग्य आहे का ? असा प्रश्न विचारला जातोय.
शेवटी सरकार कोणाचेही असो चूक ही चूक आहे. राज्यात सर्वत्र बांधकाम विभागाचे कामे पैसे नसल्यामुळे थाबले आहे आणि इकडे मंत्र्यांचे बंगले चकाचक करण्यासाठी कोटया वधी पैसा ओतला जातो आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर असे खर्च दुर्लक्षित होतात. हा अनावश्यक खर्च आहे. हा खर्च होऊ नये यासाठी भाजप भूमिका घेईल. हा खर्च जनतेच्या पैशातून होतोय. कोणाच्यातरी सांगण्यावरुन खर्च होतोय असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. सरकारकडून यावर अद्याप कोणते स्पष्टीकरण आले नाही.
हे पण वाचा:-हिंगणघाट जळीत कांड प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम कोर्टात दाखल सुनावणीला सुरुवात.
कोणत्या बंगल्यावर किती खर्च पहा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा – ३ कोटी २६ लाख
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी -१ कोटी ७८ लाख
- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयलस्टोन – २ कोटी २६ लाख
- सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत – १ कोटी ४६ लाख सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा चित्रकूट -३ कोटी ८९ लाख
- उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा शिवनेरी -१ कोटी ४४ लाख
- अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा रामटेक – १ कोटी ६७ लाख
- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा बी ३ – १ कोटी ४० लाख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा सातपुडा – १ कोटी ३३ लाख
Comments are closed.