Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यासाठी पुढचे तिन ते चार तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून इशारा. कोकण विदर्भात येत्या २४ तासात पावसाची शक्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क १४ डिसेंबर : – राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रविवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे . अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आजही सकाळपासूनच मुंबई , ठाणे , नवी मुंबई , पालघर, वसई-विरार, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भातील वातावरणावर त्याचा परिणाम झाला असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे…

त्यामुळे आज आणि उद्या नागपूरसह विदर्भात पावसाची शक्यता नागपुर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज सकाळ पासूनच नागपूरात वातावरण बदलले असून वातावरणात गारठा निर्माण झाला आहे . काल जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतर आजही अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वातावरणातील हा गारवा उद्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात थंडीचा जोर वाढणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.