उद्यापासून किसान संघर्ष यात्रा – महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलन तीव्र
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १४ डिसेंबर : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन पेटले असतांना नागपूर जिल्ह्यात आज दि. १४ डिसेंबर रोजी आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वात दि. १५ डिसेंबरपासून किसान संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा दि. १५ ते २२ डिसेंबर रोजीपर्यंत काढण्यात येत आहे.
यात्रेची सुरुवात नागपूर येथे मंगळवार दि. १५-१२-२०२० दुपारी १२.०० वाजता करण्यात येईल. तेथून कामठी भाकपा कार्यालय येथे दुपारी १.०० वाजता स्वागत होईल. पुढे आमडी-हिवरा-हिवरी, अंजनी, आमलापूर, नगरधन, किचाडा, काचुरवाही, मसला, भडारबोडी, महदुला, पाताळात, नवरगाव मार्गे रामटेक येथे मुक्काम. दुसऱ्या दिवशी बुधवार दि. १६ डिसेंबरला सकाळी महाराजपूर, गुडेगाव, मुसे्वाडी, उमरी, नवेगाव, चिचदा, घोटी, हिवरा बाजार, बेल्ला, मानेगाव, पिडकापार, लोधा, करवाही, दुपारी ३.०० वाजता मानेगाव टेक, खुरसापार, गर्रा, बांद्रा, उसरीपार, कडबीखेडा, देवलापार, वडाबा, सिदेवानी, कट्टा, पेढरी, वरघाट, सिल्लारी, पिपळा, घोटि, दाऊदा, अंबाझरी, हिवरा, पवनी, मनसर, पटगोवारी इथून नागपूरला रात्री मुक्कामी. त्यानंतर नागपूर येथून गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता कान्होलिबारा, भिमनगर, गडकरी, गोंडवाना, पिंपरी, मडवा, किन्ही भानसुली, टाकळघाट, ढवळपेठ, दुधा, मांडली, कवठा, ब्राह्मणी, बोरखेडी, बुटिबोरी, सुकळी, गणेशपुरे, बुटीबोरी, सातगाव, शिवतीर्थ नगरी येथे मुक्काम, शुक्रवार दि. १८ मोरारजी मिल, साहिल धाबा, गुमगाव, रिंग रोड- खड्का, सुकळी गुपचूप, हिंगणा, वानाडोगरी, राजीवनगर, अमरनगर, त्यानंतर दुपारी कवडस, अडेगाव डवलामेटी, ८.०० वाजता मैल, दत्तवाडी, वाडी मुक्काम, शनिवार दि. १९-१२-२० बोरगाव, खंडाळा, वलनी , माउरझरी , भरतवाडा , गोधनी , बोखारा, लोणारा, नागपूर दि. २०-१२-२० भंवरी, वडोदा , सुगाव , नान्हा, अंबाडी, कुही , खोबना , चापेगडी, माळवा, माढळ दुपारचे जेवन- वग, डोगरमौदा, चिकना, धामणा , तारणा , उमरेड , मुक्काम, सोमवार दि. २१-१२-२० उमरेड, भिवापूर, सिरसी- नांद- शेडेश्वर सावंगी- बेला- सोनेगाव- मोहगाव – नागपूर मंगळवार दि. २२-१२-२० नागपूर, मालेगाव- सावनेर- खापा- सुरेवानी-कोथुळना- करभाड- पारशिवनी- वनेरा- नरहर- कोलितमारा-घाट पेढरी-नागपूर येथे सांगता होईल, असे किसान सभेचे अरुण वनकर यांनी कळविले.
हे पण वाचा:- शासनाला निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा ५० लाखांचा गंडा
Comments are closed.