Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शासनाला निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा ५० लाखांचा गंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १४ डिसेंबर: सेक्युरिटी  एजन्सीमधील सुरक्षा रक्षकांचे भविष्य निर्वाह निधी व जीएसटीचे पैसे शासकीय खात्यात जमा न करता ५० लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी निवृत्त कर्नल मलकतसिंग करमसिंग (६२, रा.लता अपार्टमेंट, गुरूनानक शाळेजवळ, जरीपटका) यांंच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मलकतसिंग याच्या विरोधात रघुवीर साधू सिंग (वय ६८, रा. नोएडा, उत्तरप्रदेश) यांनी तक्रार दाखल केली.  तक्रारदार रघुवीर सिंग निवृत्त कर्नल आहेत. दोघेही एकमेकांना ओेळखतात. २०१७ मध्ये रघुवीर सिंग यांनी हेडवे नावाची सेक्युरिटी एजन्सी स्थापन केली. नागपुरातील कारभार मलकितसिंग याच्याकडे सोपविला. त्याला कपनीत भागीदारही करून घेतले. बँकेसह शहरातील विविध ठिकाणी मलकितसिंग याने ३६ सुरक्षा रक्षक तैनात केले. त्याने ऑगस्ट २०१७ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीतील सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व जीएसटी जमा केला नाही. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा:- व्वा!… रस्ते दुरुस्ती साठी पैसा नाही पण मंत्र्यांच्या बंगला दुरुस्ती वर तब्बल ९० कोटींचा खर्च

याबाबत रघुवीर सिंग  यांना माहिती मिळाली. त्यांनी दस्तऐवजाची तपासणी केली असता खात्री पटली. रघुवीर यांनी मलकितसिंगला विचारणा केली. तरीही पैसे जमा केले नाही. अखेर रघुवीर यांनी जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर.एन.फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर.बी.अंबोरे यांनी तपास करून मलकितसिंग यांंच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मलकितसिंग फरार झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.