Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी येथील रोलच्या वनौषधी प्रकल्प व प्रशिक्षण केंद्राच्या नविन वास्तुचा ‘लोकार्पण सोहळा’ उद्या

अहेरी, दि. १४ डिसेंबर : दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हींग एव्हान्समेंट (रोल), अहेरी या संस्थेच्या चिंचगुंडी ता. अहेरी स्थित वनौषधी प्रकल्प व प्रशिक्षण केंद्राच्या नविन वास्तुचा ‘लोकार्पण सोहळा’ उद्या 15 डिसेंम्बर  सकाळी १० वाजता  आयोजित करण्यात आलेला आहे.

या वास्तूचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचारक अतुल लिमये यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह दिपकराव तामशेट्टीवार यांची राहणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे येथील वनात मोठ्या प्रमाणात वनौषधी आहेत. अनेक दुर्धर रोगांवर या वनौषधी चा वापर केला जातो.या प्रकल्पाच्या माध्यमातून वनौषधी वर संशोधन होणार आहे. या वास्तूच्या लोकार्पणाला उपस्थित राहण्याचे आवाहन रोलचे अध्यक्ष रमेशभाई पटेल व सचिव डॉ. सुरेश डंबोळे यांनी केले आहे.  

Comments are closed.