Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलींवर बलात्कार

परिचयाच्या व्यक्तिकडूनच अत्याचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. ३१ ऑगस्टवसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात आज तीन पोलीस स्थानकात बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले. अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बहुतांशी अत्याचार हे परिचयाच्या व्यक्तीकडून झाल्याचे निदर्शनास येत असून ही बाब गंभीर आहे. पालकांनीही आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहिले पाहिजे.
विरार,वालीव, व तुळीज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१८ वर्षाच्या आणि ५ महिन्यांची गरोदर असलेल्या पिडीतीने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मागील ५ वर्षांपासून तिच्याच चाळीत राहणारा एक इसम तिच्यावर अत्याचार करत होता. विरार पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

वालीव पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हाही अश्याच प्रकारचा असून एका १७ वर्षीय मुलीला तिच्याच परिसरातील एका इसमाने शाळेत सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. तर तुलिंज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एका १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून उत्तर प्रदेश येथे नेऊन तिच्यावर बऱ्याच वेळा बलात्कार करून तिला परत नालासोपारा येथे सोडून आरोपी पसार झाला आहे. या तिन्ही प्रकरणी पोलीस कसोशीने तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गणेशोत्सव देखाव्यावर पोलिसी कारवाई

मुंबई पोलिसांना आता १५ लाखात मालकीची घरे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.