Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरेश कौलगेकर यांना पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार घोषित

जय महाराष्ट्र चॅनेलचे सिंधुदूर्ग प्रतिनिधी पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ  राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार घोषित.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 सिंधुदूर्ग, दि. १८ मे : जय महाराष्ट्र चॅनेलचे सिंधुदूर्ग प्रतिनिधी  सुरेश कौलगेकर यांना पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार घोषित झाला आहे.

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधींच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन २०२२च्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराची घोषणा आज सिंधुदूर्ग देवगड पोभूर्ले येथे मराठी  वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या १७६व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधींच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी घोषणा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुरेश कौलगेकर यांनी कोकण सारख्या ग्रामीण भागातील अनेक सामाजिक विषयांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक दुर्लक्षित घटकाना समाजात स्थान व त्याच्या प्रश्नांनाना व्यासपीठ देण्याचे कार्य केले. समाजीकतेबरोबरच क्रीडा,शिक्षण, साहित्य, पर्यटन ,कृषी , क्राईम विषयक घटना याना पत्रकारितेतून न्याय दिला यंत्याच्या सर्वांगीण कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे आज पर्यत त्यांना राज्यस्तरीय  आमदार गुरुनाथ कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय गुरुकुल पुरस्कार २०१२, वेताळ प्रतिष्ठान तर्फे २०१७ चा राज्यस्तर आदर्श पुरस्कार त्याच तालुका,जिल्ह्यास्त्ररावरील विविध पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मूल्याकन समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, शासनाची राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी समिती, प्रजापीता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मीडिया विंभाग सदस्य, मुबई आंबा महोत्सव प्रसिद्धी विभाग समिती, महाराष्ट्राचा सुवर्णी महोत्सव समिती सदस्य, वेंगुर्ला तालुका क्रीडा समन्वय समिती, यशवतराव चव्हाण प्रतिष्ठान समिती, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआदोलन समिती यासह अन्य समितीवर यशस्वी कार्य केले आहे.महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघ याच्या माध्यमातून सिंधुदूर्ग जिल्ह्या श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील पत्रकार याना विशेष सोयी सवलतीचा लाभ मिळवून दिला आहे व कार्य अविरत सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज पर्यंत दैनिक रत्नागिरी एक्स्प्रेस ,दैनिक पुढारी, दैनिक मुबई  महानगर, दैनिक मुबई संध्याकाळ, दैनिक मुबई नवाकाळ, दैनिक मुबई लक्षदीप ,दैनिक कोकणसाद,दैनिक सागर ,दैनिक गोवादूत , दैनिक पुण्यनगरी ,  दैनिक सिंधुदूर्ग समाचार,  दैनिक रत्नागिरी टाईम्स ,दैनिक रणझुझार,  ,दैनिक नवशक्ती, दैनिक  नवप्रभा गोवा यामधून लिखाण सुरू आहे जय महाराष्ट्र चॅनेल मधून सिंधुदूर्ग प्रतिनिधी म्हणून काम सुरू आहे.

पत्रकारितेत जवळ जवळ वीस वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत आहेत.त्यामुळे पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ  राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार घोषित केला असून त्याचे पुरस्काराचे वितरण ६ जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या जन्मदिनी समारंभ पूर्वक वितरण केले जाणार आहे. असे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधींच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी घोषणा केली आहे.

पत्रकार सुरेश कौलगेकर याना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा : 

भीषण दुर्घटना : मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 ठार

हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.