Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनजमिनीवर अवैध ताबा, विक्री प्रकरणात दोषारोप उघड होताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला केले निलंबित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 21 फेब्रुवारी :- गडचिरोली वनपरिक्षेत्रातील तसेच शहराच्या मध्यभागी परिसरात असलेल्या कक्ष क्रमांक 21 आणि 100 मधील वनजमिनीवर अवैधरित्या भूखंड पाडून कोट्यवधी रुपयांच्या किंमतीच्या जागेची विक्री प्रकरणात भुखंड माफियांवर कारवाई करण्यात आठ महिन्यांचा कालावधी ओलांडून ही कुठलीच कारवाई केली नसल्याने गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांना निलंबित करण्यात आले आहे.

शहरातील आयटीआय ते गोकुळनगर बायपास मार्गावर असलेल्या सर्वे क्रमांक 21 आणि 100 मधील 1.29 हेक्टर वनजमिनीवर भूमाफियांना अतिक्रमण केले होते. काही दिवसांनी त्यावर प्लॉट पाडण्यात आले व काही भूखंडाची विक्री देखील केली. सदर प्रकरण प्रसार माध्यम उचलून धरल्याने वनविभाग खडबडून जागे होवून वन जमिनीवरील अतिक्रमण काढून आपल्या ताब्यात घेतली असून चौकशीत अहवालही संशयास्पद असून तपास योग्य रीतीने केला नसल्याचां प्राथमिक अंदाज लक्षात घेवून अरविंद पेंदाम यांना गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी चौकशीअंती पेंदाम यांना निलंबित केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.