Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात: कार-कंटेनरची समोरासमोर धडक, धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावरील शिलाटणे गावाजवळील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे डेस्क, दि. ३० जानेवारी : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावानजीक कार आणि कंटेनरची समोरसमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याहून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या इको कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी कार दोन्ही मार्गामधील दुभाजक ओलांडून ती पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कार कंटेनर खाली घुसल्याने कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने कारमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस विभागाला कळवताच लोणावळा उपविभागीय पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह, देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या पथकाच्या मदतीने अपघातग्रस्त कारला बाहेर काढून, कारमधील पाचही प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! महिला पोलीस शिपाईने केली आत्महत्या!

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ३ व ४ कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद

भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.