Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुजरातमध्ये ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू.

Get real time updates directly on you device, subscribe now.

या अपघातामध्ये तब्बल 16 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे.

एसएसजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वडोदरा डेस्क :- गुजरातमध्ये बडोद्यात ट्रक आणि कंटनेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे तर तब्बल 16 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. बडोद्यातील वाघोडीया क्रॉसिंग हायवेजवळ ही घटना घडली आहे.

या भीषण अपघातातील जखमी सुरत इथून पावागडकडे जात होते. यावेळी ट्रक आणि कंटनेरमध्ये टक्कर झाल्याने अपघात घडल्याची प्राथमिक मागिती देण्यात आली आगे. ही धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये 11जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना तातडीने वडोदरा इथल्या एसएसजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अद्याप अपघाताचं मुख्य कारण कळू शकले नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अपघातामधील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. एका लग्नसमारंभातून ते परत येत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 11 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.