दहशतवादाला पाठिंबा आणि मदत पुरवणाऱ्या देशांना दोषी ठरवले जावे : नरेंद्र मोदी.
कोविड नंतरच्या जागतिक उभारीमध्ये ब्रिक्स अर्थव्यवस्थांची महत्वाची भूमिका असेल.
ब्रिक्स (ब्राझील-रशिया-भारत-दक्षिण आफ्रिका) देशांच्या 12 व्या परिषदेला संबोधित केले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोविड 19 च्या साथीच्या परिस्थितीत आर्थिक सुधारणांवर भर देणार्या ब्रिक्स (ब्राझील-रशिया-भारत-दक्षिण आफ्रिका) देशांच्या 12 व्या परिषदेला संबोधित केले. रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवाद ही आज जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की, दहशतवादाला पाठिंबा आणि मदत पुरवणाऱ्या देशांनाही दोषी ठरवले जावे आणि या समस्येचा संघटित पद्धतीने सामना केला जावा. आम्हाला आनंद आहे की रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स दहशतवाद विरोधी धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. हे एक महत्वपूर्ण यश आहे. आणि भारत हे कार्य आपल्या अध्यक्षपदाच्या काळात आणखी पुढे नेईल.
कोविड नंतरच्या जागतिक उभारीमध्ये ब्रिक्स अर्थव्यवस्थांची महत्वाची भूमिका असेल. आपल्या देशांमध्ये जगातील 42 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आहे आणि आपले देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुख्य इंजिनांपैकी आहेत. ब्रिक्स देशांमध्ये परस्पर व्यापार वाढवायला खूप वाव आहे. आपल्या परस्पर संस्था आणि व्यवस्था, ब्रिक्स आंतरबँक सहकार्य व्यवस्था, न्यू डेव्हलमेंट बँक, आपत्कालीन राखीव व्यवस्था आणि सीमाशुल्क सहकार्य आदी जागतिक उभारीत आपले योगदान अधिक प्रभावी बनवू शकतात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
Comments are closed.