नागपूर जिल्ह्यात ३२ नवीन कोरोना रुग्णांची भर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १७ नोव्हेंबर: दिवाळीचे पर्व संपले आहे. दिवाळीतील बाजाराची गर्दी आणि अनलॉकची परिस्थिती पाहता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. हिवाळ्याची सुरूवात झाली असून थंडी देखील वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेनेने वर्तविली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ३२ रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता १ लाख ६ हजार ५९३ वर पोहोचली आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही ९९ हजार ९८८ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण ९३ टक्के असल्याने समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३५२५ मृत्यूची नोंद झाली आहे. भविष्यात नागरिकांनी आतातरी सावधता बाळगून कोरोनापासून आपली सुरक्षा करण्याची गरज आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क घालुनच बाहेर पडावे. सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे. तेव्हाच कोरोनावर नियंत्रण येऊ शकेल.
नागपूर जिल्हा कोरोना दैनंदिन अहवाल
आजचे पॉझिटिव्ह : ३२
प्राप्त अहवाल : २७८
पॉझिटिव्ह : ३२
निगेटिव्ह : २४६
बरे झालेले : ९९९८८
मृत्यू : ३५२५
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह : ३०८०
Comments are closed.