पदविधर व बेरोजगारांच्या समस्या सोडविणार : संदीप जोशी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. १७ नोव्हेंबर : गडचिरोली व अहेरी या दुर्गम भागात बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. येथे अनेक पदवीधर असून देखील त्यांना रोजगार नाही. या सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांच्या समस्या गांभीर्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी दिले. त्यांनी मंगळवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून तेथील कार्यकर्त्यांचा भेटी घेतल्या.
यावेळी त्यांच्या समवेत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते, आ. डॉ.देवराव होळी, प्रदेश सचिव राजेश बकाने, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री रवी ओलालवार आदी उपस्थित होते. अहेरी येथे संदीप जोशी यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्बरीशराव आत्राम यांची भेट घेउन चर्चा केली. जोशी यांनी अहेरी, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, वडसा या भागात जाऊन कार्यकर्त्यांचा भेटी घेतल्या. अहेरी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, भामरागडचे सुनील बिश्वास, भाजपा आदिवासी आघाडी मोर्चाचे प्रकाश गेडाम उपस्थित होते.
चामोर्शी येथे स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना संदीप जोशी यांनी पदवीधर मतदार संघाचा इतिहास सांगितला. पदवीधर निवडणूक ही संघटन कार्याची परीक्षा असते. संघटनेने काम केले तर निवडणूक पक्ष जिंकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपणच जबाबदारीने काम करा, असे सांगितले. यावेळी बंगाली आघाडीचे सुरेश शाह, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, जिल्हा व्यापारी आघाडीचे जगदीश टावरी, राहुल चोपरा उपस्थित होते.
गडचिरोली येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष योगिता पिपरे, संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे उपस्थित होते. येथील आयोजित मेळाव्याला संदीप जोशी यांनी संबोधित केले. आरमोरी आणि वडसा देसाईगंज येथेही कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. येथेही संदीप जोशी यांनी संबोधित केले.
Comments are closed.