राम कदम यांचे जनआक्रोश आंदोलनापूर्वी पोलिसांच्या ताब्यात.
पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राम कदम यांनी ‘जनआक्रोश’ आंदोलनआयोजित केलं होतं.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी ‘जनआक्रोश’ आंदोलनआयोजित केलं होतं. ‘जनआक्रोश’ आंदोलन रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी भाजप आमदार राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. त्या अगोदरच पोलिसांनी राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच राम कदम यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं आहे.
पालघर साधू हत्या प्रकरणी आक्रोश यात्रा काढणार होते. पण त्याअगोदरच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. राम कदम यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
महाराष्ट्र सरकार आपल्याला पालघरला जाण्यापासून रोखत आहेत. कुणाकुणाचा आवाज दाबणार तुम्ही? असा सवाल देखील केला आहे.
Comments are closed.