Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवघ्या तीन वर्षांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला

सर्वात लहान वयात कविता, पोवाडा गाण्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद ; घोरपडे पेठेत राहणारी वेदांशी भोसले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क,

पुणे १५ फेब्रुवारी : बालपणात चिऊ- काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत प्रत्येकजण मोठा होतो. पण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशी भोसले हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला आहे. सर्वात लहान वयात पोवाडे गाण्याचा हा विक्रम तिच्या नावावर आहे. अवघ्या ३ वर्षांची ही चिमुकली परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खड्या आवाजात गाते.

वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील असून सध्या ती तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क येथील ओडेन्स या शहरात रहात आहे. ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात ३ मिनिटे आणि ५८ सेकंदात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा तिने गायला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्वात लहान वयात (वय ३ वर्ष ५ महिने १९ दिवस) पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे. आई प्रीती भोसले हि गृहिणी आहे आणि वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. वेदांशी ही २ वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हणते.

संतोष भोसले म्हणाले, परदेशात वडीलधा-या मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा सतत प्रयत्न आम्ही करीत असतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रीती भोसले म्हणाल्या, मी वेदांशीला दररोज मराठी भक्ती गीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि कथा ऐकवत असे आणि तितकेच मन लावून वेदांशी या सगळ्या गोष्टी ऐकायची आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करायची. या गोष्टीचा परिणाम तिचे वय वाढत असताना खूप छान झाला आणि त्यामुळेच ती सगळे श्लोक, भावगीते व पोवडा आनंदाने म्हणते, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा ,

 

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा : अन्यथा मुंबईत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.