Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर परिसरात रुग्णसेवा देणारे डॉ. नित्यानंद तिवारी यांचे निधन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

पालघर दि,१५ फेब्रुवारी : रुग्ण सेवेला समर्पित असे व्यक्तिमत्त्व, डॉ. एम.एल ढवळे मेमोरियल ट्रस्टचे माजी संचालक तसेच रुग्णालयातील डॉक्टरांचे गुरु डॉ. नित्यानंद तिवारी (७४) यांचे आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. पालघर परिसरात त्यांनी अनेक दशके रुग्णसेवा दिली. तसेच, ढवळे रुग्णालयाच्या उभारणीत तसेच जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने वैद्यकिय क्षेत्र आणि सामान्य नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

डॉ. तिवारी हे डॉ.एम.एल ढवळे यांचे शिष्य आणि सहकारी होते. डॉ.एम.एल ढवळे ट्रस्ट च्या स्थापनेपासून त्याच्या विस्तारासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. सेंट्रल काऊन्सिल ऑफ होमिओपॅथी च्या गव्हर्नरपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांचे होमिओपॅथिक शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान असून, ‘The journey to unprejudiced observation’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुलगे, सूना, नातवंडं असा परिवार आहे. त्यांचा मुलगा आनंद तिवारी हा प्रख्यात लेखक, दिग्दर्शक असून त्यांची bandit bandish ही मालीका लोकप्रिय झाली होती.

हे देखील वाचा ,

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संताच्या आचरणातील एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा ; कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे

अवघ्या तीन वर्षांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Comments are closed.