Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी तालुका पत्रकार संघटनेचे उपविभागातील समस्यांबाबत वनमंत्र्यांना साकडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,
अहेरी दि,१५ फेब्रुवारी : अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची बकालावस्था, महसूल विभागाच्या अटी व शर्तींना न जुमानता होणारे अवैध उत्खनन, वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या ठिकाणी होणारी अवैध्य कामे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त जंगल व्याप्त व मागास अहेरी विभागाकडे शासनाचे लक्ष केंद्रित करून विविध समस्या निवारणासाठीचा पुढाकार पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वात पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदनातून विनंती केली आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात चालू असलेल्या विकास कामांची गती अतिशय मंद आहे. राजनगरी म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात ठसा निर्माण करणारी अहेरीची विकासगंगा ग्रामपंचायत पासून नगरपंचायतीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात गतिशील नाही. जिल्हा दारूबंदी असला तरी दारू न मिळणारे गाव शोधून सापडणे कठीण असल्याने येथील बेरोजगारीच्या खाईत असलेल्या नागरिकांना व्यसनाचे ग्रहण लागले आहे.

वनविभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. तसेच वनविभागातील बहुतेक कामांची अवैधता, बांधकाम विभागातील रस्त्यांबाबत दुर्लक्षता लक्षात घेता राज्याचे वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी समस्यांच्या निवारण्या करता पुढील महिन्यात दौरा करणार असल्याचे संकेत तालुका पत्रकार संघटनेच्या शिष्ट मंडळाला दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी संघटक सदाशिव माकडे, यांचेसह उपाध्यक्ष आसिफ पठाण, सचिव रमेश बामनकर, संघटक साई चंदनखेडे, सहसचिव मुकुंदा दुर्गे ,संतोष ताटीकोंडावार चे सहकार्य लाभले.

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अवघ्या तीन वर्षांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला

 

संताच्या आचरणातील एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा ; कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Comments are closed.