Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोण असली कोण नकली याचा आज होणार फैसाला..

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि. २० जुलै : शिवसेनेत बंडखोरी करत, महाविकास आघाडी सरकारला चितपट करून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारची वैधता आज सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हीमा कोहली यांच्या तीन सदस्यीय खंडपीठापुढे आज ही महत्त्वपूर्ण सुनाकणी होणार असल्याने, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षामुळे निर्माण झालेल्या घटनात्मक पेचाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी गंभीर दखल घेत तीन सदस्यीय खंडपीठ नियुक्त करून यासंदर्भातील याचिकांची सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन करणाऱ्या बंडखोर गटाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांना अपात्रतेसंदर्भात बजावलेल्या नोटिसीविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच, या बंडखोर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असताना राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला सरकार स्थापन करण्याची परवानगी देणे, हे घटनाबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे शिवाय, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणीवेळी शिवसेना पक्षाचा व्हीप न पाळणाऱया आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात देखील शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आजच्या निकालाने देशातील लोकशाहीचा फैसला होणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा:

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक…

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.