Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली-सिरोंचा महामार्ग च्या दुरावस्थेला जबाबदार कोण वनविभाग की सार्वजनिक बांधकाम विभाग…?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. २० जुलै: महाराष्ट्र व तेलंगाणा राज्यांना जोडणारा गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वपुर्ण अश्या आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग चे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून सदर महामार्ग चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सदर भागातील जनता व लोकप्रतीनीधी यांच्या कडून शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा सुरू आहे. असे असतानाही सदर मार्गांचे काम काही ना काही कारणास्तव थंडबस्त्यात पडून असल्याचे चित्र गेल्या दोन वर्षांत तयार झाले आहे.

आलापल्ली-सिरोंचा महामार्ग तयार करण्यास सर्व सोपस्कार पार पडले आहेत पण वनविभागाच्या नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने सदर रस्त्यांचे काम ठप्प असल्याचे राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांच्या कडून सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यातील अनेक कामांना वनविभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने विकास कामे ठप्प पडली आहे. असे चित्र दिसत असल्याने या रस्त्या बाबत ही असेच घडले असल्याची मान्यता सर्व स्तरातील घटकांनी मानली आहे. 

वनविभागच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील सर्वांत मोठी अडसर असल्याचा शिक्का मोर्तब करण्यात आला. परंतु आता सामाजिक कार्यकर्ते उमाजी अडकूजी गोवर्धन यांनी केंद्रीय जडवाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना व राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उमाजी गोवर्धन यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, आलापल्ली-सिरोंचा महामार्ग करिता वनविभागा कडून कोणत्याही प्रकारची हरकत नसुन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली यांनी उदासीनता जबाबदार असल्याचे म्हणत सदर रस्त्यांच्या नाहरकत प्रमाणपत्र करीता त्यांनी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर केलेला नाही व सदर नाहरकत करीता वनविभागाच्या अधिकारी यांच्या सोबत संयुक्त तपासणी करीता दोन वेळा हजर नसल्याने वनविभागाची नाहरकत प्रमाणपत्र प्रक्रीया अजुन पुर्ण झाली नसल्याचे म्हटले आहे.

सदर बाबी ची चौकशी करून वनविभागाला बदनाम करणारे षडयंत्र थांबवून वनविभागाची प्रतीमा मलीन होण्या पासुन थांबविण्या बाबत म्हटले असून राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे स्टाईलने वनविभागावर रस्त्यांच्या कामाचे दिरंगाचे खापर फोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग चे कार्यकारी अभियंता यांचा समाचार घेतील असा आशावाद व्यक्त केला आहे.

गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त व दुर्गम असल्याने या जिल्ह्यातील विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभाग चे अधिकारी त्यांच्या सवलती नुसार करून बाकी कामे नकरता त्या कामांचे खापर वनविभागावर फोडत तर नाही ना अश्या चर्चेला उधाण आले आहे.

हे देखील वाचा :-  कोण असली कोण नकली याचा आज होणार फैसाला..
👇

कोण असली कोण नकली याचा आज होणार फैसाला..


र परिस्थिती संदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील मोठी बातमी..
👇🏻
मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्ह्यासह शहरातील जनजीवन विस्कळीत… https://youtu.be/lA-gGWmf6O0

Comments are closed.