Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोमवारपर्यंत वीज बिलं माफ करा अन्यता आंदोलन करू- मनसे.

वाढीव वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याची भूमिका राज्य सरकारनं घेतल्यानंतर मनसे या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क :– सर्वसामान्यांना आलेल्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. सोमवारपर्यंत वीज बिल माफ केले नाही तर राज्यात जनआंदोलन करु, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वाढीव वीजबिलासंबंधित मनसे पदधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाढीव वीजबिलात माफ करण्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेची फसवणूक आहे. त्यामुळं जनतेमध्ये संतापाची भावना आहे. सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

सोमवारपर्यंत वीजबिल माफ नाही केलं तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलनं होतील. तसंच, महावितरणचे कर्मचारी वीज कापण्यासाठी आल्यास मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.