Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड लोहखाणीत अपघात; अभियंत्यासह ३ जणांचा मृत्यू, दोन किरकोळ जखमी..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

एटापल्ली, 7 ऑगस्ट 2023 :एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीत लोहखनिजाचे उत्खनन करत असताना व्होल्व्हो मोठा ट्रक बोलेरो कम्पेर वाहनावर वरून खाली कोसळल्याने तीन जण ठार तर दोन जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (ता. ६) संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. यात एका अभियंत्याचाही समावेश आहे.

सोनल रामगिरवार (३३) रा. नागेपल्ली, ता. अहेरी, असे मृत अभियंत्याचे नाव असून, मृतांमध्ये हरियाणा राज्यातील दोन मजुरांचाही समावेश आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील दोन वर्षांपासून सुरजागड पहाडावर लायड मेटल्स कंपनीतर्फे लोह खनिजाचे उत्खनन केले जात आहे. रविवारी संध्याकाळी उत्खनन करीत असताना लोहखनिज भरलेला मोठा ट्रक खाली असलेल्या बोलेरो कम्पेर वाहनावर कोसळला. यात वाहनात असलेले अभियंता सोनल रामगिरवार व अन्य दोन मजूर ठार झाले. एटापल्ली पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.